शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Pune News | सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला दोन लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:18 IST

बोलण्यात गुंतवून घेतला ओटीपी...

पुणे : आपला गोपनीय क्रमांक कोणाला सांगू नका, ओटीपी कोणाला शेअर करु नका, याविषयी बँका, पोलीस वारंवार जनजागृती करीत असतात. आपल्या मोबाईलवर त्यासंबंधित मेसेज बँकांकडून नियमितपणे पाठविले जातात. असे असतानाही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सुशिक्षितच सर्वाधिक अडकत असल्याचे दिसून आले आहे.

क्रेडिट कार्ड बंद करण्याचे असल्याचे सांगणाऱ्या एका नेत्र चिकित्सक महिला डॉक्टराला सायबर चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून गोपनीय क्रमांक व ओटीपी जाणून घेतला आणि काही मिनिटात त्यांच्या खात्यातून १ लाख ९७ हजार ८२७ रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसरमधील एका ३७ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला एका हॉस्पिटलमध्ये नेत्र चिकित्सक आहेत. त्यांना ७ एप्रिल रोजी मोबाईलवर फोन आला. त्याने तुमच्या क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स व इतर सर्व्हिस चार्ज लागले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का असे विचारले. त्यांनी क्रेडिट कार्ड बंद करायचे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने तुमच्या कार्डच्या मागे असलेल्या कस्टमर केअर नंबर वरुन तुम्हाला फोन येईल. त्यांना सांगून तुम्ही कार्ड बंद करु शकता, असे सांगितले.

त्यानंतर काही वेळाने १८०० नंबरने सुरु होणाऱ्या नंबरवरुन त्यांना एक फोन आला. त्याने त्यांची माहिती विचारुन घेतली. तुम्हाला कार्ड बंद करायचे असेल तर मागील तीन आकडी नंबर जाणून घेतला. त्यानंता तुम्ही जो पत्ता दिला आहे, त्याच पत्त्यावर रहाता का. बँकेने पत्त्याचे व्हेरिफिकेशन केले का. बँकेचा माणूस तुमच्या घरी येईल, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यातच त्यांना त्याने तुम्हाला ओटीपी आला असेल, तो सांगा, असे म्हणाला. बोलण्याच्या नादात त्यांनी त्याला ओटीपी सांगितला.

त्यानंतर काही मिनिटात त्यांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी १ लाख ९७ हजार ८२७ रुपये काढून घेऊन खाते रिकामे केले. त्यांनी तातडीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. सायबर पोलिसांनी पुढील पावले उचलून ही रक्कम ज्या बँकेत गेली, त्यांच्याशी पत्रव्यवहार करुन ही रक्कम गोठविली आहे. पोलीस निरीक्षक शिवले तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम