शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीसाठी फीडर बसची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 01:53 IST

फायद्याबाबत साशंक : गोडाऊनच्या जागेवर ४० मजली इमारत

पुणे : मेट्रोसाठी कनेक्टिव्हिटी नसेल, तर ती तोट्यात जाण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून २ किलोमीटरच्या परिघात ही छोट्या वाहनांची सुविधा असेल. उन्नत, भुयारी व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो एकत्र येणार आहे त्या गोदामाच्या जागेवर इंटरचेंज्ािंग स्थानक असेल. तिथे ४० मजली इमारत बांधण्यात येणार आहे.

वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ यांनी ही माहिती दिली. रांची, जयपूर येथे मेट्रो सुरू झाली. शहरातून मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना येण्यासाठी सुलभ व्यवस्था न केल्यामुळे या मेट्रोना अपेक्षित प्रवासी मिळाले नाहीत. त्यामुळे आता केंद्र सरकारने देशात जिथे मेट्रो प्रकल्प सुरू आहेत, त्या सर्व ठिकाणी प्रवाशांना थेट स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी म्हणून लहान वाहनांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातही अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.ही वाहने लहान असतील. २ किलोमीटरच्या परिघात ती फिरतील. प्रवाशांना त्यातून थेट मेट्रो स्थानकापर्यंत येते येईल किंवा मेट्रोमधून बाहेर पडल्यावर शहरात इच्छित स्थळी जाता येईल. ही वाहने इलेक्ट्रिक वाहनेही असू शकतील. महामेट्रो कंपनीकडे त्याची व्यवस्था असेल किंवा स्थानिक प्रवासी सेवाही हे काम करू शकेल. त्याचे शुल्क मेट्रोच्या शुल्कात निगडित असेल. खासगी कंपनीही हे काम करू शकेल, असे गाडगीळ यांनी सांगितले. पुणे मेट्रोसाठी अशी व्यवस्था करण्यात येणार आहे; मात्र  ती चालवायची कोणी, याचानिर्णय अद्याप झालेला नाही, असे ते म्हणाले.

सरकारी गोदामाच्या येथे करण्यात येणाऱ्या इंटरचेंज स्टेशनसाठी ४८ हजार चौरस फूट जागा लागणार आहे. यातील सरकारी मालकीची गोदामाची जागा मेट्रोकडे हस्तांतरित झाली आहे. उर्वरित वसाहती असलेल्या जागेबाबत बोलणी सुरू आहेत. या सर्व रहिवाशांचे योग्य ठिकाणी समाधान कारक पुनर्वसन करण्यात येईल. संपूर्ण जागा ताब्यात आल्यानंतर तिथे ४० मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात मेट्रोचे इंटरचेंज स्टेशन असेल, उर्वरित इमारत व्यावसायिक वापरासाठी मेट्रोच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.इंटरचेंजिंग स्टेशनमेट्रो मार्गाचे काम सुरू असतानाच इंटरचेंजिंग स्टेशनचेही काम करण्यात येईल. तिन्ही स्थानके वेगवेगळी असतील. त्यातील वनाझ ते रामवाडी हा मार्ग उन्नत आहे व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत भुयारी असेल. भुयारी मार्गाचे स्थानक खाली जमिनीत व त्यावर उन्नत मार्गाचे स्थानक अशी एकाखाली एक स्थानके असतील. शिवाजीनगर ते हिंजवडी हे स्थानक या दोन्ही स्थानकांपासून थोडे दूर प्रस्तावित करण्यात आले आहे. ते कदाचित बदलण्यात येईल.मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी फक्त फीडर बसच नाही, तर सायकल, शेअरिंग रिक्षा, पीएमपी, टॅक्सी अशा अनेक गोष्टी आहेत. शिवाय काहीरस्त्यांवर स्काय वॉकही बांधण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो