शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप केले नसल्यास एफडीए करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:32 IST

फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप करणे कायद्याने बंधनकारक असून याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात येणार आहे.

पुणे : अनेक ऑनलाईन अ‍ॅप्सच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी नागरिकांच्या घरापर्यंत करण्यात येत आहे. यात माेठ्याप्रमाणावर स्पर्धा असल्याने नवनवीन अ‍ॅप बाजारात दाखल हाेत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे काही व्हिडीओ समाेर आले हाेते. एका व्हिडीओत फूड डिलिव्हरी बाॅय रस्त्यात थांबून ग्राहकांच्या पार्सलमधील अन्न खात असल्याचे समाेर आले हाेते. त्याचबराेबर त्यांच्या आराेग्याचा मुद्दा देखील चर्चीला जात हाेता. फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप करणे कायद्याने बंधनकारक असून याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात येणार आहे. या फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप केले नसल्यास एफडीएकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. येत्या एक एप्रिलपासून ही  कारवाई करण्यात येणार आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये फूड डिल्हिवरी करणाऱ्यांच्या अनेक तक्रारी समाेर आल्या हाेत्या. फूड डिलिव्हरी करणारे हे केवळ हाॅटेलमधील अन्न हे ग्राहकांपर्यंत पाेहचविण्याचे काम करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप करणे गरजेचे नसल्याचा समज निर्माण झाला हाेता. परंतु या कर्मचाऱ्यांचे सुद्धा हेल्थ चेकअप करणे एफडीएच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. याचा हेतू ग्राहकांना अन्न सुरक्षित रित्या मिळावं हा आहे. त्यांना कुठलाही त्वचा राेग किंवा इतर संसर्गजन्य आजार असता कामा नये. चेन्नई येथील एका ग्राहकाला त्याच्या अन्नामध्ये रक्त असलेलं बॅण्डेज आढळून आले हाेते. त्याची माेठ्याप्रमाणावर साेशल मीडियावर चर्चा झाली हाेती. त्यामुळे आता फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचे वेळाेवेळी हेल्थ चेकअप करणे आणि त्याची माहिती ठेवणे कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. येत्या एक एप्रिलपासून धडक माेहीम हाती घेऊन हेल्थ चेकअप नसेल तर एफडीएकडून कारवाई करण्यात येणार आहे. 

याबाबत बाेलताना एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, कायद्यानुसार सर्वच हाॅटेलमध्ये काम करणारे वेटर आचारी आणि फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना हेल्थ चेकअप करणे बंधनकारक आहे. अ‍ॅप्सच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना याची आवश्यकता नाही असा समज निर्माण झाला हाेता. ताे चुकीचा आहे. फूड हॅण्डलिंग करणाऱ्या प्रत्येकाला हेल्थचेकअप करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याचबराेबर अशा कर्मचाऱ्यांना कुठलाही त्वचा राेग असू नये तसेच इतर संसर्गजन्य आजार असून नयेत. येत्या एक एप्रिल पासून एफडीएकडून कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप करण्यात आले आहे की नाही याची तपासणी करण्यता येणार आहे. यात अन्न पदार्थ हाताळणाऱ्या सर्वांचाच समावेश असणार आहे. हाॅटेल्सबराेबरच किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग