शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

बर्फ उत्पादकांना एफडीएची नोटीस

By admin | Updated: June 26, 2015 04:20 IST

अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, न्यायालयापर्यंत प्रकरण नेले, तर आम्ही औद्योगिक वापराचे बर्फ उत्पादित करतोे.

पिंपरी : अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, न्यायालयापर्यंत प्रकरण नेले, तर आम्ही औद्योगिक वापराचे बर्फ उत्पादित करतोे. हे बर्फ खाण्यायोग्य नाही, असे फलक कंपन्यांमध्ये लावतो. येथून बर्फ नेणारे त्याचा उपयोग खाद्यपदार्थांमध्ये करतात की अन्य कोठे करतात, याच्याशी आमचा काही संबंध नाही. अशी कारवाईतून सहीसलामत बाहेर पडण्याची पळवाट शोधून ठेवलेले बर्फ उत्पादक अडचणीत सापडले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करायची. पाण्याचे नमुने, कंपनी तपासणी, तसेच जबाब, पाहणी अहवाल तयार करायचा. तो पाठवून त्या आधारे प्रकरण पुढे न्यायालयापर्यंत न्यायचे. परंतु, शेवटी बर्फ उत्पादकांवर कारवाई होण्याऐवजी ते सहीसलामत सुटायचे, ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी उलट प्रक्रिया केली. थेट कंपनी पाहणी न करता, छोटे व्यावसायिक जे कुल्फी तयार करण्यासाठी, बर्फाचा गोळा तयार करण्यासाठी, लिंबू सरबत, उसाचा रस यासाठी बर्फ घेऊन जातात. त्यांना हातगाडी घेऊन जाताना बर्फ कंपन्यांजवळच गाठले. कोठून बर्फ आणतात, याची माहिती घेतली. त्यांनी याच कंपन्यांमधून बर्फ आणत असल्याचे कबूल केले. त्यांचे जबाब घेतले. तसेच, अशा व्यावसायिकांना जागेवर जाऊन जे बर्फाचा पुरवठा करतात, त्या पुरवठादारांचा शोध घेतला. ते कोठून बर्फ आणतात, कोणाकोणाला वितरित करतात, याची माहिती घेतली. त्यांनतर पुढील कारवाईची प्रक्रिया केली आहे. कोणत्याही प्रकारे पळवाट शोधून हालचाल करता येणार नाही, अशा पद्धतीने कारवाईची प्रक्रिया झाली आहे. औद्योगिक वापराचा बर्फ खाण्याच्या पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात येत असताना आम्ही हा बर्फ खाण्याच्या पदार्थासाठी देत नाही, अशी दिशाभूल करणारे बर्फ उत्पादक कायद्याच्या कात्रीत अडकणार आहेत. (प्रतिनिधी)