शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या हव्यासापोटी मुलाकडूनच बापाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:07 IST

जमीन विक्रीच्या कागदावर सही करत नसल्याने मुलानेच आपल्या मठात सेवेकरी असलेल्या बापाचा खून केला.

ठळक मुद्देभुलेश्वर मठ येथील खुनाचा गुन्हा उघड : पुणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केला तपासवडिलांच्या नावे असलेली जमीन गावातील एका इसमास विकण्याचे कबूल करून त्याच्याकडून विसार रक्कम

यवत: भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला असणाऱ्या ओम शांती मठात झालेल्या खुन हा जमिनीच्या हव्यासापोटी करण्यात आला असून तो मयत व्यक्तीच्या मुलानेच केला असल्याचे गुन्हा पुणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. सुखराज दगडू टेमगिरे (वय ४० रा.भरातगाव ता.दौंड जि.पुणे) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. ७ मे रोजी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या ओम शांती बाबा मठातील सेवेकरी दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय ७० रा.भरतगाव ता.दौंड ) यांचा अज्ञात इसमाने शस्त्राने डोक्यात वार करून खून केला होता.   गुन्हे शाखेच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मयत दगडू टेमगीरे हे अत्यंत मनमिळावू चांगल्या स्वभावाचे तसेच सांप्रदायिक पंथाचे व धार्मिक असल्याने त्यांचे गावात कोणाशी वैर नव्हते. त्यांचा लहान मुलगा सुकराज (वय ४०) यास दारूचे व्यसन असून त्याने वडिलांच्या नावे असलेली जमीन ही त्याच गावातील एका इसमास विकण्याचे कबूल करून त्याच्याकडून विसार रक्कम घेतली होती. परंतु वडिलांचा जमीन विकण्यास विरोध असल्याने ते कागदपत्रावर सही करत नव्हते. यातूनच आरोपी सुखराज टेमगिरे याने सायंकाळी मठात वडील पालथे झोपलेले असताना त्या संधीचा फायदा घेत लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केले. वडील प्रतिकार करू लागल्यावर त्यांच्या तोंडावर उशी ठेऊन त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता जमिनीच्या हव्यासापोटी स्वत:च्याच वडिलांचाच खून केल्याचे कबूल केले.     पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदिप पखाले व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. यात गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, दयानंद निम्हण, अक्षय जावळे यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी केली आहे.

टॅग्स :PurandarपुरंदरMurderखूनCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस