शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: बापानेच केला सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून; आरोपी ३ तासात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 12:55 IST

बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली.पोलिसांनी सावत्र मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाच्या आत अटक करुन जेरबंद केले आहे.

 पारवडी गावचे पोलीस पाटीलांनी पारवडी गावचे हददीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकाने स्वतःच्या मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी  पोहचले. यावेळी आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरी साठी पारवडी गावचे हददीत आला असून त्याने त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्या रागात मारुती जाधव याने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी धातुच्या कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करत खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. 

आरोपीस अवघ्या ३ तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश 

गुन्हेशोध पथकाने तत्काळ आरोपी अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. आरोपी मोबाईल वापर करीत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते. तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्याने आरोपीची कोणतीही ओळख फोटो उपलब्ध नव्हता. सदर आरोपी अटक करणे जिकीरीचे काम होते. गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सूचने प्रमाणे घटना स्थळापासूनचा वनविभागाचा १० ते १५ कि मी चा टप्पा पायी चालत शोधमोहीम राबवली. त्यानंतर वनविभागातील झाडीत लपलेला आरोपीस अवघ्या ३ तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. 

पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू