अभ्यास केला नाही म्हणून बापाने मोडला मुलीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST2021-05-29T04:08:39+5:302021-05-29T04:08:39+5:30

पुणे : केवळ अभ्यास केला नाही म्हणून एका बापाने सात वर्षांच्या मुलीला लाटणे आणि हाताने मारहाण केली. यात मुलीचा ...

The father broke the daughter's hand as she did not study | अभ्यास केला नाही म्हणून बापाने मोडला मुलीचा हात

अभ्यास केला नाही म्हणून बापाने मोडला मुलीचा हात

पुणे : केवळ अभ्यास केला नाही म्हणून एका बापाने सात वर्षांच्या मुलीला लाटणे आणि हाताने मारहाण केली. यात मुलीचा हात मोडला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बापाला अटक करण्यात आली.

नागेश महादेव जाधव (वय ३६, रा. भाजी मार्केट, ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. याबाबत आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या मिनाज विशाल भोले (वय २४, रा. ताडीवाला रोड) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित मुलगी ही तिच्या आई-वडिलांसह ताडीवाला रस्त्यावर असलेल्या भीमसेवा तरुण मंडळासमोर रहायला आहे. मुलगी अभ्यास करीत नाही म्हणून नागेश याने तिला मंगळवारी (दि. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास लाटणे आणि हाताने मारहाण केली. त्यानंतर तिच्या आईला शिवीगाळ केली. मारहाणीत मुलीचा हात मोडला आहे. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपीने यापूर्वी देखील मुलीला अभ्यासावरून मारहाण केली होती, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

नागेश याने मुलीची लैंगिक छळ केला आहे का? याचा तपास करायचा आहे. तसेच गुन्ह्याच्या इतर तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला उद्या (दि. २९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. के. गोरड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: The father broke the daughter's hand as she did not study