शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बहीण म्हणून सांगणाऱ्या महिलेसोबत वडीलांना मुलीनेच पकडले लॉजवर रंगेहाथ; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:12 IST

तरुणीचे वडील आणि एका महिलेवर गुन्हा दाखल...

पुणे : आपली बहीण असल्याची ओळख सांगता आणि तिच्याबरोबर लॉजवर काय करता, असा प्रश्न तरुणीने वडिलांना विचारत रंगेहाथ पकडले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्याच मुलीला मारहाण करुन तिला लॉजच्या त्याच खोलीत कोंडून दोघे पसार झाले. ही घटना हवेली तालुक्यातील कुडजे येथील साहील लॉजवर २८ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन किरकटवाडी येथे राहणार्‍या तरुणीचे वडील आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकटवाडी येथे राहणार्‍या फिर्यादी यांचे वडील कर्वेनगर येथे राहणार्‍या एका महिलेची आपली बहीण असल्याची ओळख सांगत तिच्याबरोबर संबंध ठेवून होते. फिर्यादी यांना त्यांच्या संबंधाविषयी संशय होता. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या पाळतीवर होती. २८ डिसेंबर रोजी ते दोघे साहिल लॉजवर गेले असताना फिर्यादीही तेथे गेल्या. तेथे एका रुममध्ये त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडले. ही तुमची बहीण आहे, असे आम्हाला सांगता मग तिला घेऊन येथे लॉजवर काय करताय, असे वडिलांना तिने विचारले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन रिलिंगवर आपटून फोडला. दोघांनी तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

हा प्रकार लॉजमधील कामगार पाहत होते. त्या दोघांनी फिर्यादी यांचा शर्ट फाडल्यामुळे कामगारासमोर हा प्रकार घडल्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी तिला रुममध्ये ठेवून बाहेरुन दरवाजा बंद करुन पळून गेले. उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीkarve nagar policeकर्वे नगर पोलीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड