शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 16:02 IST

वडिलांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती

चाकण : वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध असल्याने मुलांनी आपल्या वडिलांचा काटा काढून ‘दृश्यम’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला. मात्र, पोलिसांच्या कल्पक तपासाने दोन सख्ख्या भावांना अवघ्या दोन तासांत गजाआड करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.धनंजय बनसोडे (वय ४५, रा. निघोजे, ता. खेड) असे खून करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे.सुजित धनंजय बनसोडे (वय २२, रा. निघोजे), अभिजीत धनंजय बनसोडे (वय १८, रा. निघोजे) अशी अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय बनसोडे यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय असून, त्यांची ‘ग्लोबल फूड्स’ नावाची कंपनी आहे. ते १५ डिसेंबर रोजी राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. याबाबतची माहिती समजल्यानंतर धनंजय यांचे घरात पत्नी व मुले सुजित, अभिजित यांच्याशी वारंवार वाद होत होते. त्यामुळे आपली मुले आपला घातपात करून जिवे ठार मारतील, अशी शंका त्यांना आली होती व ती त्यांनी नागपूर येथील प्रेयसीस बोलून दाखवली होती. दरम्यान, धनंजय हे बेपत्ता असल्याबाबत तपास करताना पोलिसांना त्यांच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला.

दरम्यान, महाळुंगे पोलिसांत धनंजय बनसोडे मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तांत्रिक माहिती वापर करून तपास करत असताना पोलिसांनी मुले सुजित आणि अभिजीत यांकडे अधिक तपास केला असता वडिलांचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने त्याला जिवे ठार मारल्याचे कबूल केले. पुढील तपास म्हाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस करत आहेत.

ग्लोबल फूड्स कंपनीचे मालक धनंजय बनसोडे यांच्या दोन मुलांनी (दि. १५ डिसेंबर) रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्यांचा खून केला. त्यानंतर दृश्यम चित्रपटात असलेल्या कथानकाप्रमाणे त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला. त्यांची हाडे फक्त शिल्लक राहिली. त्यानंतर (दि. १९ डिसेंबर) रोजी दोन्ही मुलांनी पोलिसात वडील बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक