७ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याच्या आरोपातून पित्याची निर्दाेष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:09 IST2021-04-13T04:09:49+5:302021-04-13T04:09:49+5:30

या खटल्याची माहिती अशी की, नालबंद हा त्याची पत्नी हसीना व ७ महिन्यांचा मुलगा शाहबाद, सासू रहीमत शेख ...

Father acquitted of murder of 7-month-old baby | ७ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याच्या आरोपातून पित्याची निर्दाेष मुक्तता

७ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याच्या आरोपातून पित्याची निर्दाेष मुक्तता

या खटल्याची माहिती अशी की, नालबंद हा त्याची पत्नी हसीना व ७ महिन्यांचा मुलगा शाहबाद, सासू रहीमत शेख यांचे सोबत (सासरवाडी खडकआळी, पणदरे, ता. बारामती) राहत होता. त्याने पत्नी हसीनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन शाहबाद हा मुलगा माझा नसल्याचे म्हटले होते. २१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या घरात कुणी नसताना शाहबाद याचा टॉवेलने गळा दाबून खून केल्याप्रकरणी नालबंद यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये सरकार पक्षाचे वतीने एकूण सहा (६) साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. जावळे यांच्यासह अ‍ॅड. गणेश धेंडे, अ‍ॅड. जीवन पवार, अ‍ॅड. प्रणिता जावळे, अ‍ॅड. मोनिका निकाळजे, अ‍ॅड. बीमा पवार व अ‍ॅड. मानसी संजय गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

————————————————

Web Title: Father acquitted of murder of 7-month-old baby