शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दरी पुलावर ट्रेलरचा भीषण अपघात; मदतीसाठी आलेल्या व्यक्तीची आग पाहून पुलावरून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 09:29 IST

सातारा ते पुणे या दिशेने येताना एक मोठा ट्रेलर अपघात होऊन पलटी झाल्याने त्याचा चालक जखमी अवस्थेत अडकला होता...

पुणे : मंगळवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. हा अपघात जांभुळवाडी येथील दरी पुल याठिकाणी झाला. सातारा ते पुणे या दिशेने येताना एक मोठा ट्रेलर अपघात होऊन पलटी झाल्याने त्याचा चालक जखमी अवस्थेत अडकला होता. 

घटनास्थळी मोठा ट्रेलर पलटी होऊन पुढील केबिनमधे सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकला होता. तत्काळ घटनास्थळी अग्नीशमन दल दाखल झाले होते. तेथे गेल्यानंतर जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्या चालकाशी संवाद साधून धीर देत अग्निशमनमधील जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर हे उपकरण वापरत तसेच एका क्रेनच्या मदतीच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढून लगेच उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

परंतू रस्त्यावर पलटी झालेला ट्रेलर पाहून एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना त्याने प्रथमदर्शनी प्रत्यक्ष हा अपघात पाहून मदतीकरिता पुढे आला. त्या ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे पाहताच त्या दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतःचा बचाव करण्याकरिता दरीपुलावरुन खाली उडी मारली होती. नंतर काही वेळाने त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल - शिवाजी मुजूमले व फायरमन शिवाजी आटोळे आणि मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवान ही मदतीकरिता दाखल झाले होते. पोलिस विभाग व उपस्थित असणारे नागरिक यांची ही मदत झाली.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातfire brigade puneपुणे अग्निशामक दल