शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:14 IST

रसिक रंगनाथ दौंड (वय १९, रा. लाखनगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे....

मंचर (पुणे) : समोर चाललेल्या दुचाकीला कारने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगावच्या हद्दीत बेल्हे जेजुरी महामार्गावर सकाळी घडली. रसिक रंगनाथ दौंड (वय १९, रा. लाखनगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

यासंदर्भात पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिक रंगनाथ दौंड (वय १९, रा. लाखनगाव, दौंडवस्ती, ता. आंबेगाव) हा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या जवळ असलेली दुचाकी (क्र.एमएच १४ सीक्यू ९८३१)वरून घरून निघाला होता. लाखनगाव गावच्या हद्दीत बेल्हे जेजुरी महामार्गावरून कार (क्र.एमएच १४ केएस ८०८७) मागून वेगाने आली. अल्टो गाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देऊन अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील तरुण रसिक याला हाता-पायास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर कार रस्त्यालगत पलटी झाली. दुचाकीचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात दत्तात्रय दौंड यांनी फिर्याद दिल्यानंतर चालक सागर भीमाजी साळवे (रा. साकुर मांडवे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्या विरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रसिक दौंड यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रसिक याचे नुकतीच दहावीचे शिक्षण पूर्ण झाले होते. आईवडिलांचा तो एकुलता एक होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात