शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'फास्ट टॅग' ठरतोय 'स्लो-टॅग'! मुंबई-पुणे महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर गोंधळामुळे रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 21:21 IST

उर्से टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यातील सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे.

शिरगाव (जि. पुणे) : शनिवार, रविवारची सुटी असल्याने मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सायंकाळी द्रूतगती मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच उर्से टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यातील सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. अनेक वाहनांवर फास्ट टॅग नसल्यामुळे तसेच ज्या वाहनांवर फास्ट टॅग होते, पण ते स्कॅन होत नसल्यामुळे सोमाटणे आणि उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोमाटणे फाटा चौकातदेखील वाहतूककोंडी झाली होती. यामुळे वाहन चालकांना मनस्ताप झाला.

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे तसेच कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे नागरिक बिनधास्त वावरत आहेत. मुक्त फिरण्यासाठी मावळ पर्यटकांना नेहमीच खुणावते. पुणे व पिंपरीमधून मावळमध्ये फिरायला येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटनस्थळे मावळमध्ये आहेत.मावळचे प्रवेशद्वार असलेल्या सोमाटणे फाटा येथे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. सायंकाळी पुण्याच्या दिशेने जाणा-या वाहनांची रांग ही सोमाटणे फाटा येथील मुख्य चौकापर्यंत गेली होती.

मावळ तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे असल्यामुळे प्रत्येक शनिवार व रविवारी महामार्गावर वाहनांची गर्दी असते. रविवारच्या सुटीच्या दिवशी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. सोमाटणे आणि उर्से टोलनाक्यावर टोल बूथमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच, कर्मचारीही वाढविण्यात आले आहेत. तरीही वाहनांच्या रांगा कमी झाल्या नाहीत. 

टॅग्स :Fastagफास्टॅगPuneपुणेtollplazaटोलनाका