शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारच्या काळातच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 01:12 IST

‘‘ज्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर येथे दिली.

इंदापूर : ‘‘ज्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूर येथे दिली.इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने, मंगलसिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलत होते.अजित पवार म्हणाले, की मागच्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात लोकसभा एकत्रित लढली होती. विधानसभा निवडणुकीतच्या वेळी वेगळा विचार करून निवडणूक लढली, त्याचा परिणाम राज्यातील सत्ता गेली. केंद्रात व राज्यात शेतकरीविरोधी, रोजगारविरोधी भाजपा सरकार सत्तेवर आले. सरकार शेतकरीविरोधी असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. भास्कर जगताप, कार्याध्यक्ष अमोल भिसे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल राऊत यांनी आभार मानले. यावेळी अमोल वीर, नंदकुमार पानसरे, अमोल भोईटे, विठ्ठल ननवरे, दत्ता बाबर, आझाद मुलाणी, अभिजित तांबिले, उमाताई इंगोले, प्रवीण माने, डॉ. शशिकांत तरंगे यांनी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे