शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:51 IST

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार पर्यंत अनुदान देण्याची घोषणा

पुणे : राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफी दिली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देखील मिळाला आहे.परंतु शासनाच्या मदतीची, कर्ज माफीची अपेक्षा न करता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून शासनानी ही प्रोत्साहन योजना कागदावरच असून, अद्याप एकाही शेतकऱ्याला लाभ झालेला नाही. यामुळे पुणे जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणारे तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी सध्या या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफी देण्याची घोषणा केली व तातडीने अंमलबजावणी देखील सुरू केली. यामुळे लाॅकडाऊन असताना देखील दीड लाखांपैकी तब्बल सव्वा लाख शेतक-यांना प्रत्येक्ष कर्ज माफीचा लाभ मिळाला. तर दुस-या टप्प्यात शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, या घोषणांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.लाॅकडाऊनमुळे अंमलबजावणी झाली नसल्याचे शासन सांगत असले तरी कर्ज माफीची अंमलबजावणी होऊ शकते मग प्रोत्साहन अनुदानाची का नाही असा असवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. पुणे जिल्ह्यात दरवर्षी तब्बल चार ते साडे चार लाख शेतक-यांना रब्बी आणि खरीप हंगमासाठी पिक कर्ज वाटप केले जाते. यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाटा एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा आहे. तर नियमित कर्जफेड करणाया शेतकऱ्यांचे प्रमाण 40 ते 45 टक्क्या पर्यंत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी किमान 600 ते 700 कोटी रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता आहे. त्यामुळे शासन प्रोत्साहन अनुदान कधी देणार यांची वाट पाहत आहेत. ------ शासनाने तातडीने प्रोत्साहन अनुदान द्यावेशासनाने मार्च महिन्यात नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना 50 हजारा पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु राज्यावर आलेल्या कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांत यांची अंमलबजावणी झाली नाही. परंतु आता लाॅकडाऊन शिथील झाले असून सर्व व्यवहार हळूहळू पुर्ववत सुरू होत आहेत. यामुळे शासनाने देखील तातडीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीState Governmentराज्य सरकार