चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:02 IST2018-11-15T23:01:27+5:302018-11-15T23:02:18+5:30
पावसाचे प्रमाण घटले : दर चांगला मिळत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंद

चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी परिसरात चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चारापिकांमुळे परिसर हिरवागार असून या चाºयाला मागणी वाढली आहे. चाºयाला दरही चांगला मिळत आहे. या परिसरात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडल्याने पशुधन जगवणे हा फक्त उद्देश शेतकºयांपुढे आहे. त्यामुळे कमी पाण्यात चाºयाची अधिक पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे.
कमी पाऊस पडल्याने या परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अत्यंत अल्प पाण्यात शेतकरी चाºयाची पिके घेत आहे.
शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे पशुधन जगवण्याची. गुरांच्या छावण्या सुरु होतील ही तर आशा शेतकऱ्यांची मावळली असून, सरकार शेतकºयांच्या गुरांसाठी चारा देणार आहे या आशेवर शेतकरी आहे. मात्र, सरकार हा निर्णय घेईपर्यंत तरी पशुधन जगविण्याची जबाबदारी शेतकºयांवर आहे. या परिसरात शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुष्काळी परिस्थितीत हे पशुधन कसे जगवायचे या चिंतेत शेतकरी आहे. दुष्काळामुळे पशुधन विकायचे झाले तर त्याला दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
या परिसरात शेतकरी पाण्याच्या मुबलकतेनुसार हिरव्या चाऱ्याची पिके घेत असून त्यामुळे गुरांनाही हिरवा चार उपलब्ध होत असून त्यातून राहिलेला चारा शेतकरी विकत आहे. हिरव्या चाऱ्यांला दरही चांगला मिळत आहे.