शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दुष्काळात फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती , वडापुरी येथील शेतकऱ्याचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 23:56 IST

नैसर्गिक संकटाला न जुमानता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यावर मात करण्यात इंदापुर तालुक्यातील वडापुरी गावचे शेतकरी हरिप्रसाद थोरात (खुळे) यांनी यश मिळविले आहे.

- भिमराव आरडेकाटी : नैसर्गिक संकटाला न जुमानता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यावर मात करण्यात इंदापुर तालुक्यातील वडापुरी गावचे शेतकरी हरिप्रसाद थोरात (खुळे) यांनी यश मिळविले आहे. शेतीला पाणी नाही म्हणून शेती पडीक न ठेवता कमी पाण्यात येणारे ड्रॅगन फ्रुटची शेतीची महाराष्ट्रातील काही भागात सध्या मोठी चलती आहे. अमेरिका, थायलंड देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाणारे हे पीक आता इंदापूर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातही मूळ धरू लागले आहे. हा पहिलाच प्रयोग थोरात यांनी यशस्वी करून दाखविला आहे.इंदापूर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी दुष्काळाच्या झळा सोसणारे गावे पारंपारिक शेतीबरोबर ऊस, द्राक्षबागेच्या पलीकडे विचार न करणाºया येथील शेतकºयांमध्ये आता वडापुरी येथील हरिप्रसाद थोरात (खुळे) हे चर्चेचा विषय ठरले आहेत.दुष्काळी स्थितीत कोरडवाहू जमिनीत, कमी पाण्यावर, औषध फवारणीचीही गरज न पडणारी ही शेती निश्चितच या भागातील शेतकºयांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. एकदा लागवड केल्यानंतर पुन्हा मशागत, औषध फवारणी सारख्या खिशाला कात्री लावणाºया खर्चापासून शेतकºयांची सुटका होते, हे या शेतीचे आणखी एक वैशिष्ट्ये. तर विविध औषधी गुण असल्याने बाजारपेठेत या फळांना देखील मागणी असते.हरिप्रसाद थोरात (खुळे)त्यांचे मिञ राजेंद्र जाधव रा.पिलिव ता माळशिरस. त्याच्या शेतात शिवारफेरी मारत असताना त्याच्या शेतात ड्रॅगन फ्रूटच्या शेती पाहण्यास मिळाली. त्यांनी त्या शेतीची तसेच बाजारपेठ याविषयी सखोल माहिती घेऊन त्यांनी त्यांचा मुलगा कन्हैया थोरात याला ही संकल्पना सांगितली. ही संकल्पना प्रत्यक्षात आण्यासाठी त्यांनी तत्काळ तयारी सुरू केली आणि ड्रॅगन फु्रट शेतीत बहरले.तीन हजार रोपांची केली होती लागवड२०१७ च्या अखेरीस जाधव याच्याकडुन ३ हजार रोपे आणून ६० गुंठे जमिनीवर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यासाठी ५ बाय १४ फूट अंतरावर सिमेंटचे खांब उभे करून त्याभोवती प्रत्येकी चार अशा एकूण ३००० रोपांची लागवड केली. एकरी साधारणत: पाचशे खांब आणि त्यावर सिमेटच्या प्लेटा लावण्यात आले. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपए खर्च आला. आत्तापर्यंत दोनवेळा बहर आल्याचे ते सांगतात.साधारणत: ५०० किलो फळे या वर्षी लागली आहेत रोपांची वाढ पुर्ण झाल्यानंतर एकरी सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्याची अपेक्षा आहे. पुणे येथील गुलटेकडी मार्केट मध्ये ही फळे विक्रीसाठी पाठविली आहे. लवकरच मुबई, बेंगलोर येथील बाजारपेठेसह मॉलमध्येही ती पाठविण्याचा त्यांचा मानस आहे.ड्रॅगन फ्रुटची शेती शासकीय अनुदान पासुन वंचित आहे त्याला शासनाचे अनुदान मिळावे. अनुदान मिळाल्यास हे पीक घेण्याकडे कल वाढेल व दुष्काळावर मात करता येईल.- हरिप्रसाद थोरात (खुळे)

टॅग्स :Puneपुणे