शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 03:19 IST

खेड ते सिन्नरदरम्यान होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामातील आळेफाटा परिसरातील प्रस्तावित बाह्यवळणात जाणाऱ्या जमीनमोजणीला आज शेतकऱ्यांनी

आळेफाटा : खेड ते सिन्नरदरम्यान होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामातील आळेफाटा परिसरातील प्रस्तावित बाह्यवळणात जाणाऱ्या जमीनमोजणीला आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा विरोध केला. बाह्यवळण रद्द करा, अशी भूमिका शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी घेतल्याने अखेर प्रशासनाने या मोजणीला स्थगिती दिली.पुणे-नाशिकदरम्यान होणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगाने सुरू आहे. आळेफाटा परिसरातून या कामातील बाह्यवळण प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील आळेफाटा, वडगाव आनंद, आळे येथील ८५ शेतकऱ्यांची जवळपास ९३ एकर सुपीक बागायती शेती संपादित करण्यात येणार आहे.या कामातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला. मार्च २०१३ या महिन्यात या बाह्यवळणाच्या जमीनमोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून या मोजणीचे कामच बंद केले होते.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग यांच्या वतीने आज पुन्हा आळेफाटा परिसरातील बाह्यवळण मोजणीला भूमिअभिलेखचे कर्मचारी आले. मात्र, त्यांना पहिल्यापासून विरोध झाला. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी, राष्ट्रीय महामार्गचे डी. एस. झोडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘विघ्नहर’चे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, सामाजिक कार्यकर्ते अनंत चौगुले, माजी सरपंच प्रदीप देवकर, संतोष चौगुले, अशोक गडगे, गणेश गडगे, गणपत वाळुंज, चंद्रशेखर गडगे, उत्तर पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुहास कहडणे, महेश शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण बाह्यवळण होऊन देणार नाही, अशी भूमिका घेतली. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी या वेळी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता तहसीलदार हिरामणी यांनी जिल्हाधिकारी व आमदार शरद सोनवणे यांच्याशी संपर्क साधला व शेतकऱ्यांच्या भावना कळविल्या. याबाबत त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढायचा, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व या मोजणीला स्थगिती देण्यात आली. (वार्ताहर)