शेतकऱ्यांच्या मुलाची वेगळी वाट, बनला नौदल अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST2021-05-31T04:09:30+5:302021-05-31T04:09:30+5:30
पांढरे दांपत्याला दोन मुले आहेत. मुलगा नौदल अधिकारी व मुलगी श्रद्धा सीएच्या अभ्यासक्रमास शिक्षण घेत आहे. काल दि. ...

शेतकऱ्यांच्या मुलाची वेगळी वाट, बनला नौदल अधिकारी
पांढरे दांपत्याला दोन मुले आहेत. मुलगा नौदल अधिकारी व मुलगी श्रद्धा सीएच्या अभ्यासक्रमास शिक्षण घेत आहे. काल दि. २९ रोजी खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) १४० व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ झाला. एनडीएमध्ये अवधूत पांढरे यांनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत नौदल अधिकारी झाले. अवधूत यांचे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण कुरवली गावातील चव्हाणवस्ती शाळेत झाले. इयत्ता ५ वी शिक्षण छत्रपती हायस्कूल परीटवाडी येथे व इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे पूर्ण केले. यादरम्यान इयत्ता १२ वीमध्ये असताना एनडीएची परीक्षा दिली नेव्हलमन म्हणून ६ महिने पूर्ण केल्यानंतर लेफ्टनंटपदी नेमणूक होणार आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाने वेगळी वाट शोधत देशकार्यासाठी जाण्याचा मार्ग निवडल्याने परिसरात अवधूतचे अभिनंदन होत आहे. शेतकरी सतीश पांढरे यांनी सध्याच्या कोविड परिस्थितीत न डगमगता मुलांना शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले. आपल्या मुलांवर अपेक्षाचे ओझे न लादता त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यास साथ दिली. त्यामुळे आज अवधूतने देशसेवेसाठी एनडीएच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सरपंच शोभा पांढरे, विजयकुमार पांढरे , सत्यवान चव्हाण, रवींद्र कदम, पैलवान नितीन माने, दिनेश पांढरे, दिलीप पांढरे,आंबादास कवळे,विठ्ठल फडतरे व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
अवधूत सतीश पांढरे