तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करावी : शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST2021-07-03T04:07:42+5:302021-07-03T04:07:42+5:30

भोर पंचायत समितीच्या सभागृहात एक जुलै कृषी दिन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त कृषी दिन ...

Farmers should cultivate using technology: Shelar | तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करावी : शेलार

तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करावी : शेलार

भोर पंचायत समितीच्या सभागृहात एक जुलै कृषी दिन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती भोर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्या वेळी शेलार बोलत होते.

या वेळी पचायत समितीच्या दमयंती जाधव, तालुका कृषी अधिकारी.हिरामण शेवाळे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, मंडळ कृषी अधिकारी शरद सावंत, राजेंद्र डोंबाळे, विस्तार अधिकारी शिवराज पाटील, तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे व शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी.हिरामण शेवाळे यांनी कृषीदिनाचे महत्त्व व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

सदर कार्यक्रमात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहीम समारोप आणि कृषी दिन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र डोंबाळे यांनी केले.

Web Title: Farmers should cultivate using technology: Shelar