शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज : पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:00 IST

रेशीम शेती ही कमी पाण्यावर येऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल

बारामती : रेशीम शेती ही कमी पाण्यावर येऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. या रेशीम उद्योगासाठी पुणे जिल्हा बँकच्या माध्यमातून पीक कर्ज भविष्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम संचालनालय नागपूर यांनी रेशीम कोष खुली बाजारपेठ सुरू करण्यास दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम कोष खरेदी केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामती अ‍ॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, रेशीम संचालनालय संचालक भाग्यश्री बानायत, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ के.एच गोविंदराज, बेंगलोरच्या रेशीम कोष मार्केटचे उपसंचालक जे. एम. मुंशी बसाप्पा, पणनचे संचालक दिपक तावरे, डॉ. उदय जावली, डॉ. कविता देशपांडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, रेशीम उद्योग हा रोजगार निर्मिती करणारा उद्योग आहे. रेशीम लागवड जोपासना, किटक संगोपन, तुती रोपांचे खर्च, शेड हे एमआरईजीएस योजनेतून शेतकºयांना मिळत आहे. कर्नाटक राज्यातील रामनगर येथील रेशीम कोष मार्केटच्या धर्तीवर येथील रेशीम बाजारपेठ भविष्यात विकसित करण्यात येईल.बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर यांनी केले. याअगोदर शेतकºयांना रेशीम कोष विक्रीसाठी रामनगर ,बेंगलोर याठिकाणी जावे लागत होते,मात्र या सुविधेमुळे शेतकºयांची सोय होणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे