शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यातील वादळी वाऱ्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले! पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 12:20 IST

आळेफाटा पोलिसांकडून सतर्कतेच्या सूचना

ठळक मुद्देएकंदरीतच वादळाचा व पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार

वडगाव कांदळी: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सकाळपासूनच हवेचा जोर वाढल्याने घरांचे नुकसान होऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्याचा जोर मधूनच वाढत आहे. तर कधीही जोरदार पाऊस येण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होईल. या भींतीने शेतकरी धास्तावला आहे.  

अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला आहे. या चक्रीवादळाचा फटका शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला बसू शकतो. त्यामुळे सकाळपासून कांदा आरणीत ठेवण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होती. ज्यांना आरण नाही त्यांना कांदा शेतातच झाकून ठेवावा लागत आहे. अशा अस्मानी संकटाला शेतकरी हैराण झाला आहे. काही शेतामध्ये पेरलेला धना एक दोन दिवसात काढण्यात येणार आहे. चक्रीवादळ होणार असल्याने धना उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. या वादळामुळे जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. एकंदरीतच वादळाचा व पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे छप्पर उडण्याची शक्यता आहे. तसेच भिंत कोसळणे, झाडे, विजेच्या तारा पडणे अशा घटनाही घडू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच झाडाखाली थांबू नये. विजेच्या तारा तुटल्यास तात्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरFarmerशेतकरीGovernmentसरकार