शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Agristack : शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅकमध्ये घरबसल्या नोंदणी शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 09:53 IST

हेलपाटे वाचणार, केंद्राकडून राज्याला प्रोत्साहनपर १४८ कोटी, सर्वांची नोंदणी झाल्यावर १२६५ कोटी मिळणार

पुणे : ओळख क्रमांक देण्यात येणाऱ्या ॲग्रिस्टॅक या योजनेत आता पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वत: नोंदणी करता येणार आहे. येत्या पंधरवड्यात याची अंमलबजावणी होणार असून यामुळे वेळेची बचत होऊन तलाठ्यांकडे तसेच सामायिक सुविधा केंद्रांवरील हेलपाटेदेखील वाचणार आहेत. राज्यात या योजनेत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला तब्बल १४८ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. राज्यातील सर्व १ कोटी २० लाख शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार झाल्यानंतर केंद्राकडून राज्याला तब्बल १ हजार २६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधारशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातील तलाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देत आहेत. या जोडीला आता सामायिक सुविधा केंद्रांमधूनही शेतकरी ओळख क्रमांक करून घेत आहेत. भूमी अभिलेख विभागाने यापुढील टप्प्यात आता थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे तलाठ्यांकडे तसेच सामायिक सुविधांकडे सुविधा केंद्रांकडे न जाता घरबसल्या शेतकरी नोंदणी करू शकणार आहेत. परिणामी त्यांचा वेळ वाचणार आहे.

दरम्यान, राज्यात १ कोटी २० लाख शेतकरी आहेत. केंद्र सरकारने या योजनेत ओळख क्रमांक दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्य सरकारला प्रोत्साहनपर निधी देण्याचे ठरविले आहे. पहिल्या २५ टक्के अर्थात ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी केल्यानंतर राज्य सरकारला १४८ कोटी ८९ लाख ९८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नोंदणीनंतर पाचशे रुपये निधी मिळाला आहे.यानंतरच्या ५० टक्के नोंदणीत प्रत्येक शेतकऱ्यामागे ७५० रुपये, त्यानंतरच्या ७५ टक्के नोंदणीत प्रत्येक शेतकऱ्यामागे १ हजार २५० रुपये तर १०० टक्के नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यामागे १ हजार ७५० रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार ५० टक्के नोंदणी झाल्यानंतर राज्य सरकारला २२३ कोटी ३४ लाख ९७ हजार रुपये, ७५ टक्के नोंदणी झाल्यानंतर ३७२ कोटी २४ लाख ९५ हजार तर १०० टक्के नोंदणी झाल्यानंतर ५२१ कोटी १४ लाख ९३ हजार असे एकूण १ हजार २६५ कोटी ६४ लाख ८३ हजार रुपये मिळणार आहेत. राज्यात १३ फेब्रुवारीपर्यंत एकूण ४० लाख ९५ हजार २९९ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. जिल्हानिहाय विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ९५ हजार ९६८ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत.

विभागनिहाय ओळख क्रमांक

पुणे १०७५८५

नाशिक ९४४६९४

संभाजीनगर ८३७३५५

अमरावती ६२२५६०

नागपूर ४८२८१७

कोकण १९९८८१

मुंबई ३१७

एकूण ४०९५२०९

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजना