शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे मोडले कंबरडे

By admin | Updated: March 2, 2015 03:13 IST

शनिवारी दुपारनंतर रात्रभर झोडपून काढलेल्या पावसाने रविवारीही अवकळेचा मारा चालूच ठेवला. २४ तासांतच ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

पिंपरी : शनिवारी दुपारनंतर रात्रभर झोडपून काढलेल्या पावसाने रविवारीही अवकळेचा मारा चालूच ठेवला. २४ तासांतच ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मावळ तालुक्यात आकडेवारी उपलब्ध नसलेल्या अनेक ठिकाणी यापेक्षाही जोरदार पाऊस झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीने विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वातावरणातील बदलामुळे शहरात स्वाइन फ्लूचे संकट गडद झाले आहे, तर ग्रामीण भागातील लोकांचा दिनक्रमच बदलून टाकला आहे. नेहमीच्या कामांमध्ये सर्वजण व्यस्त असतानाच या वर्षातील पहिल्या जोरदार अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसाने एकीकडे सर्वांना गारठून टाकले असतानाच अनेकांना या अवकाळीचा धक्का बसला आहे. लग्न समारंभात विघ्नशनिवारी लग्नतिथीचा चांगला मुहूर्त असल्याने शहर परिसरातील ८० हून अधिक मंगल कार्यालयांमध्ये दुपारी साखरपुडा समारंभ दणक्यात साजरे झाले. मात्र परण्याची वेळ झाली, नवरदेव थाटामाटात घोड्यावर बसला, कलवरे जोषात नाचत निघाले; इतक्यात पावसाने आपले रूप दाखविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मौजमजेने सरींमध्ये नाचणाऱ्या वऱ्हाडींना क्षणात वाढलेल्या पावसाने गारठून टाकले. लग्नाचा जोष एका घटकेनेच फिका पडला. लग्नामध्ये मोठे विघ्न आल्याने ऐनवेळी लॉनमध्ये लाखोंचा खर्च करून उभारलेल्या सेटवर पाणी सोडून बंदिस्त हॉलमध्ये दाटीवाटीने बसून लग्न उरकरण्याची वेळ वऱ्हाडी मंडळींवर आल्याचे चित्र रावेत, वाकड, किवळे, भोसरी, चिखली, रहाटणी परिसरातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये पाहण्यास मिळाले. काही ठिकाणी वधू-वर बोहल्यावर चढल्यावरच पावसाची लक्षणे दिसल्याने सजावटीचा खर्च वाया जाऊ देण्यापेक्षा भर पावसात लग्न लावण्याचे प्रकार झाले. साचलेल्या पाण्याने हैराणपावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरवासीय पुरते हैराण झाले होते. काही कौलारू, तसेच पत्र्याचे छत गळके असल्याने पाणी गळतीने भाडेकरूंची झोप उडविल्याची माहिती मिळाली आहे. पिंपरी मंडईत पहाटेपासूनच भाजी खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना गाळ्यांमध्ये साचलेले पाणी उपसण्याची कसरत करण्याची वेळ आली. सकाळी ८ पर्यंत बादल्यांमध्ये भरून पाणी बाहेर टाकण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरूच होती. डेअरी फार्मकडून रेल्वेफाटक ओलांडून महामार्गाकडे येणाऱ्या रस्त्यावर, शंकरवाडी रेल्वे पूल, बोपोडीतील भुयारी मार्ग, पुनावळे भुयारी मार्ग, आकुर्डी-निगडीतील मार्गावरील सखल भाग आदी ठिकाणी पाणी साचल्याने चालकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागली.पथारीवाले गायबपावसाने झोडपल्यानंतर रविवारी शहरातील रस्त्यांवरून पथारीवाले गायब झाल्याचे चित्र दिसून आले. नेहमी गजबज राहणाऱ्या पिंपरी कॅम्प, थिसेनक्रुप चौकाकडून कॅम्पाकडे जाणाऱ्या मार्गालगत कोणताही पथारीवाला नसल्याने रस्ता बऱ्याच दिवसांनंतर मोकळा दिसून आला. हातगाड्यांवरून भाजी विकणारांचे प्रमाणही रोडावले. अनेकांनी घरी बसून आराम करण्यालाच पसंती दिली. डांबरीकरणात खोळंबाशहराच्या अनेक भागात सध्या डांबरीकरणाचा सपाटा सुरू आहे.मात्र दोन दिवसांत पावसामुळे या कामाचा खोळंबा झाला आहे. हे काम बंद करण्याची वेळ कंत्राटदारांवर आली आहे.नवीन पिकाला फायदापावसामुळे फलधारणा नसलेल्या बहुतेक बागायती पिकांना पाणी देण्याचा खर्च वाचला आहे. याचबरोबर उशिराने पेरणी केलेल्या व दाणे भरण्याच्या स्थितीतील ज्वारी, हरभरा या कोरडवाहू पिकांना पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकरी सांगतात.