शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो पीकविम्यासाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज; १४ पिकांना मिळणार योजनेतून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:47 IST

इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन...

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

योजनेमध्ये कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. यंदापासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीकविमा संरक्षण मिळण्यासाठी ३१ जुलै या मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय विमा कंपनी

नगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.

परभणी, वर्धा, नागपूर : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

जालना, गोंदिया, कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.

नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम.एस. जनरल इं. कंपनी लि.

वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड : भारतीय कृषी विमा कंपनी

हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, उस्मानाबाद : एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कं.लि.

यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्स

लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स

योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास तालुका संबंधित पीकविमा कंपनीचे कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, नजीकची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाMaharashtraमहाराष्ट्रCrop Loanपीक कर्ज