शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 19:15 IST

इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता. 

इंदापूर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात 

इंदापूर :  इंदापूर शहरात सोलापूरचे प्रभाकर देशमुख आंदोलन करणार असल्याचे समजताच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कार्यकर्त्यांनी दांडा आंदोलन केले. तालुक्यातील २२ दुष्काळी गावांकरिता उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. 

बुधवारी ( दि.१६ ) इंदापूर नगरपरिषद प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी ११ वाजता दांडा मोर्चाला सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इंदापूर पोलिसांना पीआरपीच्या वतीने निवेदन देण्यात आले. इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता. 

यावेळी आंदोलनाचे नेते संजय सोनवणे म्हणाले की, इंदापूर तालुक्याला हक्काचे ५ टीएमसी पाणी  मिळाले होते. मात्र सोलापूर मधील काही दलाल व स्वयंघोषित नेत्यांनी सुपारी घेवून आंदोलन केले व आदेश करुन रद्द करण्यास शासनावर दबाव आणला व आदेश रद्द करण्यास भाग पाडले. ज्यांनी पुढाकार घेवून आंदोलन केले तेच आज इंदापूर तालुक्यात येऊन पाणी सोडवू म्हणत शेतकऱ्यांची चेष्टा करणार असतील तर त्यांना त्याचा जाब विचारण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांना जाब विचारण्यासाठी, आम्ही दांडा आंदोलन केले आहे. 

__________________________________________________

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडणाऱ्या देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

जिल्हाधिकारी यांनी इंदापूर येथे देशमुख यांना आंदोलनाची परवानगी नाकारली असतानाही, इंदापूर येथे येवून, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करून, घोषणाबाजी करत आंदोलन केले व जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून आंदोलन केल्या प्रकरणी आरोपी प्रभाकर देशमुख यांना इंदापूर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणagitationआंदोलन