शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी आयुक्तालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 22:14 IST

नेवासा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याच्या गैरकारभाराची तक्रार करुनही कारवाई का केली जात नाही, याचा जाब विचारत एका शेतकऱ्याने शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देगैरकारभाराची तक्रार करुनही कारवाई का केली जात नाही, याचा जाब विचारत आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : नेवासा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याच्या गैरकारभाराची तक्रार करुनही कारवाई का केली जात नाही, याचा जाब विचारत एका शेतकऱ्याने शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पुणे रेल्वे स्थानकाजवळील कृषी आयुक्तांच्या दालनाबाहेरच ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत कर्मचारी आणि उपस्थितांनी आग विझविल्याने शेतकऱ्यास कोणतीही इजा झाली नाही. दीपक धनगे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. धनगे याने नेवासा तालुका कृषी अधिकाऱ्याविरोधात कृषी आयुक्तांकडे तक्रार केली होती. तालुका अधिकारी गैरव्यवहार करीत असल्याचा त्याचा आरोप होता. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का केली जात नाही, याची माहिती घेण्यासाठी संबंधित शेतकरी आणि पाच ते सात जण आयुक्तालयात आले होते. कृषी आयुक्त दालनात उपस्थित नव्हते. ते पाहिल्यानंतर शेतकरी दालनाबाहेर आला. सुरुवातीस त्याच्याकडील रुमाल पेटवित स्वत:ला पेटविण्याचे म्हणू लागला. रुमाल विझल्याने त्याने काडी पेटवून सदयाला लावली. इतरांनी त्याच्याकडे धाव घेत आग विझविल्याने शेतकऱ्यास कोणतीही इजा झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संबंधित शेतकऱ्याने नेवासा तालुका अधिकाऱ्याविरोधात पत्र दिले होते. त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र, अधिकाऱ्यावर कारवाई का करीत नाही, असा जाब विचारत त्याने आयुक्तालयाला आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेAgriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी