गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:48 IST2018-07-14T01:48:02+5:302018-07-14T01:48:11+5:30

बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.

Farmer suicides news | गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सुपे : बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) दंडवाडी येथे संतराज महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी येणार असल्याने सर्वच ग्रामस्थ गावाच्या मुख्य रस्त्याकडे आले होते. या वेळी शिवाजी चांदगुडे त्या ठिकाणी होते. मात्र काही वेळाने त्यांनी दंडवाडी- सुपे रस्त्यावरील शेतात असणा-या बांधावरील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी या रस्त्याने येणा-या वारक-यांनी याबाबतची खबर दिल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंके यांनी दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी त्यांना मणक्याचा विकार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र बँकेचे सुमारे २ लाख ४१ हजारांचे मध्यम मुदत तसेच पीक कर्ज होते. तसेच आणखीन जिल्हा बँक व सोसायटीचे कर्ज आहे का,
याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती येथील मंडलाधिकारी राहुल जगताप, तलाठी डब्ल्यू. एस. झगडे यांनी दिली.

Web Title: Farmer suicides news