शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:39 IST

फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, चार पिकांसाठी ३० जूनची मुदत ठेवण्यात आली

पुणे : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, चार पिकांसाठी ३० जूनची मुदत ठेवण्यात आली आहे. तर, अन्य पिकांसाठी १४ व ३१ जुलै अशी मुदत असेल. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी, तसेच ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी विमा पोर्टल www.ncip.gov.in सुरू झाले आहे. केंद्र सरकारने सुरुवातीला लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या चार पिकांसाठी १४ जून ही सहभागाची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत ३० जून करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या मुदतवाढीला विमा कंपन्यांनी सहमती दर्शविली असून, केंद्र सरकारही मुदतवाढ देईल, असे आवटे यांनी स्पष्ट केले. याच योजनेत मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून तर डाळिंबासाठी १४ जुलै व सीताफळासाठी ३१ जुलै अशी मुदत असेल.फळपिकांच्या उत्पादनावर कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता यांसारख्या हवामान घटकांचा विपरीत परिणाम होतो. या योजनेतून अशा नैसर्गिक परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, ई-पीक पाहणीतील जिओ टॅग फोटो, तसेच ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ई-पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो. ही ई-पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चार फळपिकांसाठी १४ जूनची मुदत होती. ती ३० जूनपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे. त्याला मान्यता मिळेल. - विनयकुमार आवटे कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन, पुणे

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना