टाकळी भीमा येथे शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:47+5:302021-02-05T05:10:47+5:30
शेतीशाळेच्या वर्गामध्ये पाटस येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना ऊस पीक विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये बेसल ...

टाकळी भीमा येथे शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा
शेतीशाळेच्या वर्गामध्ये पाटस येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना ऊस पीक विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये बेसल डोस, उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, पाणी व खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ऊस पिकातील कार्य, हुमणी व खोडकीडा, कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी श्रीनाथ म्हस्कोबा कारख्यान्याचे ऊस विकास अधिकारी राजेश थोरात यांनी मातीपरीक्षण, फुटवा व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी ऊसपिकात जिवाणू खते, संजीवकांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. महेश रुपनवर यांनी प्रास्ताविक तर आभार एकनाथ मांढरे यांनी केले.
या वेळी माजी तालुका कृषि अधिकारी तानाजी मेमाणे, माऊली कापसे, अमोल सातव, कृषि सहायक संकेता शिंदे, कृषि मित्र रवींद्र नरसाळे, योगेश भोसले, एकनाथ मांढरे, नामदेव मेमाणे, आप्पा ठाकर, भरत वडघुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.