शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोरोनामुळे शुभमंगल 'विना वराती' सावधान'; घोडे दावणीला, व्यावसायिकांची होतेय ओढाताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 12:59 IST

लग्न समारंभावर बंधने; घोड्यासह कुटुंब जगविणे झाले मुश्किल.....

अविनाश हुंबरे- 

सांगवी : कोरोनाच्या काळात कडक लॉकडाऊन मध्ये लग्न समारंभावर नातेवाईकांच्या उपस्थितीसह वेळेचीही मर्यादा आल्याने लग्न संबंधित सर्व छोटे मोठे व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मिरवणुकीत भाडेतत्वावर आणला जाणारा शाही घोडा...मात्र कोरोना काळात मिरवणुकांना परवानगी नाकारली गेल्यामुळे वर्षभरापासून तो दावणीलाच बांधला असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे घोडे व्यावसायिकांवर  उपासमारीची वेळ आली आहे. 

कोरोनामुळे आता अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडत आहेत. वास्तविक पाहता, विवाह समारंभ म्हटला की मोठा बडेजावपणा असतो. प्रत्येक जण किती मोठे कर्ज झाले तरी चालेल असे म्हणत थाटामाटात लग्न समारंभ पार पाडतात. 

नवरदेवाची वरात काढण्यासाठी खास घोडा मागविला जातो. बारामती शहरासह ग्रामीण भागात विवाहसमारंभात मिरवणुकीला घोडा भाड्याने उपलब्ध करून देणारे अनेक व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून हा कालावधी लग्नसराईचा असतो.मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घातल्याने अडचणीत भर पडली आहे.  तासभर वापरण्यात येणाऱ्या शाही घोड्यासाठी साधारणत: पाच ते सहा हजारापर्यंत भाडे आकारले जात असतात. परंतु यंदा मिरवणूक बंद असल्याने घोडे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ........

काहींचे तब्बल १० ते १२ घोडे असून जगण्यासाठी घोड्यांना देखील रोजचा चारा आला, कुटुंब उपाशी मरू नये म्हणून दररोज राशन आले, परंतु लग्नसराईला मर्यादा आल्याने उपजीविकेचे साधन असणारा घोडाच वर्षभर एका जागीच उभा असल्याने त्याच्यासह कुटुंब जगविणे मुश्किल झाले असल्याचे घोडे व्यावसायिकांनी सांगितले.यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. 

लग्नसराई, व इतर समारंभ आता होत नसल्याने घोडे व्यावसायिक, फोटोग्राफर, केटर्स,फुलविक्रेते,वाजंत्री, मंगल कार्यालये, मंडप डेकोरेटर्स, अशा व्यावसायिकांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

..................

एका घोड्याचा दररोज विविध खाद्यासह चाऱ्याचा खर्च दोनशे ते अडीचशे रूपये येतो. त्यातही माझे ८ घोडे दावणीलाच बांधून असल्याने मोठी ओढाताण होतं आहे.तसेच बारामती तालुक्यात घोड्यांना लग्नाचे भाडे मिळणे बंद झाल्याने सामान्य घोडे व्यावसायिक हतबल झाले आहेत.- रणजित भारत खोमणे, घोडे व्यावसायिक, शिरवली, ता. बारामती )

टॅग्स :Baramatiबारामतीmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे