शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी पुणे विभागात घेणार मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 01:15 IST

भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे.

पुणे : भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अनेक हात सरसावतात, असे असतानाही हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषदेने हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना दत्तक घेण्याचे ठरवत आयोजित केलेला मेळावा कौतुकास्पद आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात हुतात्म्यांची अनेक कुटुंबीये असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना केवळ पैशाच्या स्वरूपात मदत न करता त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अडणींची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना या कुुटुंबीयांना दत्तक घेण्याचे ठरवले आहे. यासाठी पहिल्या टप्यात ११५ कुटुंबीयांची निवड करण्यात आली असून महिला दिनानिमित्त शुक्रवारी जिल्हा परिषदेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसेकर बोलत होते.या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (निवृत्त) जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.डॉ. म्हैसेकर म्हणाले, हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी योजना खूप असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन झाले नाही तर त्याचा फायदा त्यांना घेता येत नाही. शासनाकडून मिळणारी मदत फक्त लवकर देण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत. जमिनीच्या मुलांच्या शाळेच्या अडचणी, आरोग्य, कागदपत्रे आदी समस्या आहेत. या सर्वांची सोडवणूक या अधिकारी मंडळींकडून केली जाणार आहे. सूरज मांढरे म्हणाले, या कुटुंबीयांच्या निरंतर पाठीशी कुणी तरी उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी मदतीचा प्रयत्न केला जाणार आहे. ११५ कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. धोरणात्मक बदलासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. ११५ कुटुंबीयांची जबाबदारी प्रत्येक अधिकाºयांना विभागून दिली आहे. त्यांना येणाºया समस्या संबंधित अधिकाºयांच्या मार्फत सोडवल्या जातील.>कुटुंबीयांनी मांडल्या समस्या१९६५, १९७१, कारगिल युद्ध तसेच शांतता काळात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे कुुटुंबीय या मेळाव्यात सहभागी झाले होते. अनेकांना शेतीसाठी जमिनी मिळाल्या नाहीत, नोकरीसाठी अर्ज करूनही नोकरी मिळाल्या नाहीत, पेट्रोल पंपासाठी अर्ज करूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही यांसारख्या समस्या अधिकाºयांपुढे मांडल्या. या वेळी उपस्थित अधिकाºयांनी त्यांच्या समस्यांचे निराकरून करून यापुढे त्यांना येणाºया प्रत्येक अडचणीत मदत करण्याचे आश्वासन दिले. माझे वडील १९६५च्या युद्धात शहीद झाले. त्यांना सेवा मेडल होते. त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय नोकरी, जमीन तसेच पेट्रोल पंप मिळावा यासाठी शासनाशी अनेक पत्रव्यवहार केले. राष्ट्रपतींनाही आम्ही पत्र लिहिले. मात्र, अद्यापही आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही. शैक्षणिक पात्रता असतानाही मला नोकरी मिळाली नाही. यामुळे अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला. जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे तसेच शासनातर्फे आयोजित अनेक मेळाव्यात सहभाग घेतला. मात्र, समस्या कायम राहिल्या. या मेळाव्यातून काही मार्ग मिळेल, अशी आशा आहे. - नवनाथ रामदास गोगावले, वीरपुत्र जिल्हा परिषदेच्या अनेक योजना शहीद कुुटुंबीयांसाठी आहेत. आम्ही त्याची यादी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. जिल्हा परिषद अधिकाºयांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड जिल्हा परिषदेला या कामी मदत करणार आहे. मिलिंद तुंगार, मेजर, जिल्हा सैनिक अधिकारी