शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 19:26 IST

य तोतया पोलीस उपनिरीक्षकाने मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने तिघांना ५१ लाखांना गंडा घातला.

पुणे : मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने कस्टममध्ये नोकरी लावतो, असे सांगून तिघांना ५१ लाख १७ हजार ४०० रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्ती पत्र देऊन अजून पैसे हडपण्याचा त्याचा डाव लक्षात आल्याने सापडू शकला.

राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याची साथीदार सुलोचना दादू सोनवणे (वय ३७, रा. टिंगरेनगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे याच्या घरातून ५ ते ६ पोलिसांचे गणवेश व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत सुरु होता. याप्रकरणी दीपक मोहनलाल मुंदडा (वय ५१, रा. शनिवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

मुंदडा यांचा गणेश मूर्ती विक्रीचा व्यवसाय आहे. तोतया शिंदे हा त्यांच्याकडे २०१४ मध्ये मूर्ती खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने आपण मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यातून पुढे त्यांच्यात ओळख झाली. दरम्यान, शिंदे याने मुंदडा यांना आपली कस्टम ऑफिसमधील अधिकारी ओळखीचे आहेत. तेथे मी तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो, असे सांगितले. तो पोलीस असल्याचे सांगत असल्यामुळे त्यांचा विश्वास बसला. तो जेव्हा जेव्हा मुंदडा यांना भेटला. तेव्हा त्याच्या गाडीत पोलिसांचा गणवेश होता. त्याच्याबरोबर असलेली सुलोचना सोनावणे ही कस्टम विभागात अधिकारी असल्याचे शिंदे सांगत असे. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्या मुलांना नोकरी लावणार आहे, त्यांना साहित्य पाठवून दिले होते. तसेच त्यांना मुंबईला नेऊन एका रुग्णालयात मेडिकलही करुन घेतली होती. 

तरुणांकडून क्लार्कपदासाठी प्रत्येकी १५ लाख तर, सुपरिडेंट पदासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून वेळोवेळी ५१ लाख १७ हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यावर वेगवेगळी कारणे सांगून त्याने टाळाटाळ केली होती. फिर्यादीचा मित्र चंद्रकांत चव्हाण यांच्याकडूनही मुलाला नोकरी लावतो, असे सांगून पैसे घेतले. 

गणवेशामुळेच फसलाशिंदे याने आपल्याला फसविले असे मुंदडा यांना संशय येत होता. त्याचवेळी गेल्या आठवड्यात शिंदे याने मुंदडा यांना फोन करुन तुमच्या मुलाची नियुक्ती पत्रे आली आहे. राहिलेले पैसे घेऊन या. नियुकतीपत्र घेऊन जा, असे सांगितले. त्याने मुंदडा यांना संगम पुलाजवळ बोलावले होते. मात्र, मुंदडा यांनी त्याला कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालयाजवळ बोलावून घेतले. मुंदडा यांनी आपल्या पुतण्या पोलीस मित्र याला बरोबर घेतले होते. तो कसबा पेठेत आल्यानंतर या पोलीस मित्र पुतण्याच्या नजरेतून तो सुटला नाही. त्याचा गणवेश पोलीस उपनिरीक्षकाचा होता पण नेमप्लेट त्याने सहायक निरीक्षकाची लावली होती. पुतण्याने त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केल्यावर तो गडबडून गेला. मुंदडा यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलीस येत असल्याचे दिसल्यावर शिंदे पळून जाऊ लागला. तेव्हा त्याला नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीjobनोकरीPoliceपोलिस