बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:50 IST2018-05-14T03:50:23+5:302018-05-14T03:50:23+5:30

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाºया इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाºयाला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली़

A fake phone call holder was arrested | बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्यास अटक

बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्यास अटक

पुणे : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाºया इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाºयाला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली़
कार्तिक माधव भट (२३) असे त्याचे नाव आहे़ दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्सच्या कार्गो कॉम्प्लेक्समध्ये २ मे रोजी सकाळी ८़१५ वाजता बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता़ ही अफवा ठरली होती़ तो फोन पुण्यातून भट याने केल्याचे समजल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक करुन दिल्लीला नेले़
पोलिसांनी सांगितले की, कार्तिक भट याचे काम समाधानकारक नसल्याने त्याला तीन महिन्यात कामगिरी सुधारण्याची तोंडी नोटीस दिली होती़ त्यामुळे निराशेनतून कंपनीला धडा शिकविण्यासाठी त्याने बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. संबंधित कर्मचाºयाला निलंबित करण्यात आले आहे.


 

Web Title: A fake phone call holder was arrested