शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रे; चौकशीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: March 2, 2015 03:19 IST

जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

पिंपरी : जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परमानंद मेहबुमल जमतानी (रा. पिंपरी) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. शरद यशवंत कोकणे (५४, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे यांची रहाटणी येथे सर्व्हे क्रमांक सहामध्ये ५४ गुंठे जमीन आहे. यावरून गेल्या अनेक दिवसांपासूनदोघांमध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयात २४ जानेवारी आणि १७ नोव्हेंबर २०१४ रोजी जमतानी यांनी जमिनी खरेदीची नोंद व्हावी, यासाठी अर्ज केला होता. दरम्यान याबाबतची माहिती कोकणे यांना माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालयात संबंधित कागदपत्रांची नोंद होऊ नये म्हणून अर्ज केला व संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले. याच कालखंडात कोकणे यांनी ४ फेब्रुवारी २०१५ ला न्यायालयात जमतानी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. त्याची सुनावणी २८ फेब्रुवारीला झाली. त्यात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यानंतर निगडी पोलिसांनी जमतानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून अप्पर तहसीलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे जमीन खरेदीखत नोंद करण्यासाठी जमतानी यांनी प्रयत्न केल्याचे कोकणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)