बनावट डॉक्टरला अटक

By Admin | Updated: May 7, 2014 01:34 IST2014-05-06T20:12:51+5:302014-05-07T01:34:44+5:30

महाराष्ट्र वैद्यकिय कौन्सिलची कोणतीही वैद्यकिय शैक्षणिक पात्रता नसताना एका महिलेवर उपचार करताना आढळलेल्या बोगस डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

Fake doctor arrested | बनावट डॉक्टरला अटक

बनावट डॉक्टरला अटक

पुणे : महाराष्ट्रा वैद्यकिय कौन्सिलची कोणतीही वैद्यकिय शैक्षणिक पात्रता नसताना एका महिलेवर उपचार करताना आढळलेल्या बोगस डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी हरिशंकर उर्फ शंकर सुयर्नारायण ठाकूर (३४, रा. वडगाव शेरी ) असे आरोपीचे नाव आहे. याच्याविरुद्ध डॉ. रेखा रमेश गलांडे (४०, रा. विमाननगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी ‘ा महानगरपालिकेत विभागीय वैद्यकिय अधिकारी आहेत. त्यांनी सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजिव वावरे यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती. ठाकूर हा बिहार येथून १२ वी सायन्स झाला आहे. मागील दीड वर्षापासून वडगाव शेरी येथील टेम्पो चौक येथील अनुप दवाखाना येथे तो कपांऊंडरचे काम करीत होता. ठाकूर हा स्वत: डॉक्टर नसतानाही बोगस डॉक्टर बनून पेशंटला डॅाक्टर असल्याचे भासवित. ठाकूर हा मंगल गोते या महिलेच्या जखमेवर ६ टाके घालनू ड्रेसिंग व इतर उपचार करताना व औषधे देत असताना आढळला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३(२), ३३(अ), भारतीय दंडविधान कलम ४२० नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ठाकूरला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला. न्यायालयाने त्याला आठ मेपर्यंत कोठडी सुनावली.

Web Title: Fake doctor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.