लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुणे शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) धाड पडल्याचे स्थानिक माध्यमांनी दिलेले वृत्त खोटे ठरले आहे. ‘लोकमत’च्या सूत्रांकडून करण्यात आलेल्या पडताळणीतून या बांधकाम व्यावसायिकांविरोधात ईडीने कोणतीही चौकशी किंवा कारवाई केलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे.
काही माध्यमांतून ईडीच्या धाडीबाबत वृत्त देण्यात आले होते. ते वृत्त खोटे ठरले आहे. मात्र, शहरातील इतर काही बांधकाम व्यावसायिकांविरोधात प्राप्तिकर विभागाकडून नियमित चौकशी सुरू आहे. काही ठिकाणची चौकशी पूर्ण झाली असून काही ठिकाणी ती पुढील काही दिवसांत संपेल, असेही कळते.