सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 08:45 PM2018-05-10T20:45:15+5:302018-05-10T20:45:15+5:30

या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे.

Facility Plot e-auction by PMRDA | सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव

सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव

googlenewsNext
ठळक मुद्देगावांचा होणार जलद विकास : पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत ई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ई-लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार

पुणे : पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने खाजगी विकासकांना देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया करण्यात येत आहे.
या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ७१४९८.८६ चौरसमीटर आहे. 
या भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय वापरासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे या गावांमध्ये शाळा, दवाखाने, शिशुवर्ग, मनोरंजन पार्क, क्रीडांगण, व्यायामशाळा, बँक एटीएम, सायबर लायब्ररी, खुला बाजार, क्रीडा संकुल, बागबगीचा, खरेदी सुविधा, प्राथमिक व माध्यमिक शाळा, वाहनतळ, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र व इतर उपयोगी सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. 
ई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर निविदाधारकांसाठी शदिवारी (दि.१९) पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निविदा सादर करण्यास सोमवार (दि.११) पर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. निविदापूर्व बैठक (दि. १९) रोजी दुपारी ४ वाजता पीएमआरडीए कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या निविदेची ई-लिलाव प्रक्रिया २५ जून २०१८ रोजी सकाळी ११ ते सायकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर ई-लिलाव पद्धतीमध्ये समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व माहिती उपलब्ध आहे.
...................
भूखंड अनुज्ञेय वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने दिले जातील. ई-लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याचा अनुज्ञेय वापर पाहता या सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Facility Plot e-auction by PMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.