शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागाच्या सर्व रेल्वेगाड्यांना‘बायोटॉयलेट’ची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:31 IST

‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ८०० रेल्वे डब्यांमध्ये बायोटॉयलेट बसविले आहे.

ठळक मुद्दे८०० डब्ब्यांमध्ये उपलब्ध, उर्वरित २०० डबे जुनपर्यंत सज्जरेल्वे मार्गावर होणाऱ्या घाणीपासून लवकरच सुटका होणार

पुणे : ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्यापुणे विभागाने ८०० रेल्वे डब्यांमध्ये बायोटॉयलेट बसविले आहे. येत्या जुन महिन्यापर्यंत उर्वरित २०० डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. त्यामुळे रेल्वे मार्गावर होणाऱ्या घाणीपासून लवकरच सुटका होणार आहे.  पुणे विभागातून प्रामुख्याने झेलम, आझाद हिंद, पटना, अहमदाबाद दुरांतो, सिंकदराबात शताब्दी, वेरावल, गोरखपूर, मंडूआडीह, एनॉकुलम, दरभंगा, लखनऊ, अमरावती तसेच कोल्हापूरहून सुटणारी महाराष्ट्र, सह्याद्री, कोयना, धनबाद तसेच नागपुर एक्सप्रेस आणि मिरजमधून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांसह पॅसेंजर गाड्या सुटतात. या गाड्यांना सुमारे १ हजार डबे आहेत. रेल्वे प्रशासनाने या सर्व डब्ब्यांमध्ये बायोटॉललेयटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेमार्गावर पडणारी घाण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत ८०० डब्ब्यांमध्ये बायोटॉललेट बसविण्यात आले आहे. तर उर्वरीत २०० डब्ब्यांमध्ये जुन महिन्यापर्यंत ही सुविधा पुरविली जाईल. मिरज, कोल्हापूर, सांगली, सातारा स्थानकांवर काही गाड्या बराच वेळ थांबतात. पण याठिकाणी रेल्वेमार्ग स्वच्छ करता येत नसल्याने डब्ब्यांमधील स्वच्छतागृहातून पडणारी घाण रेल्वेमार्गावर पडते. त्यामुळे स्थानकांमध्येही दुर्गंधी पसरते. बायोटॉयलेट लावल्यामुळे या स्थानकांसह रेल्वेमार्गावर कुठेही अस्वच्छता राहणार नाही. तसेच पुणे स्थानक परिसरात बायोटॉयलेटच्या वापराबाबत माहिती देणारी सुविधाही करण्यात आली आहे, असे देऊस्कर यांनी सांगितले. ------------- बायोटॉयलेट प्रणालीमध्ये खाली एक टाकी बसविण्यात आली. त्यामध्ये विशेष प्रकारचे जिवाणू असतात. हे जिवाणू जैविक प्रकियेद्वारे मानवी विष्टेचे रुपांतर द्रवरुपात करतात. तर अस्वच्छ पाण्याला क्लोरीनच्या माध्यमातून स्वच्छ केले जाते. त्यामुळे रेल्वे मार्गावर अस्वच्छता होत नाही.- मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक-------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे