बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीवर ‘नजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:33 IST2018-05-18T01:33:49+5:302018-05-18T01:33:49+5:30

बायकोवर पाळत ठेवण्यासाठी पुण्यातील एका उच्चशिक्षिताने बेडरूममध्ये चक्क छुपा कॅमेरा लावला होता. पत्नीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

The 'eye' on the wife by putting a camera in the bedroom | बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीवर ‘नजर’

बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीवर ‘नजर’

पुणे : बायकोवर पाळत ठेवण्यासाठी पुण्यातील एका उच्चशिक्षिताने बेडरूममध्ये चक्क छुपा कॅमेरा लावला होता. पत्नीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुण्यामध्ये ही घटना घडली आहे.
वानवडी पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी पतीने २२ ते २६ जानेवारीदरम्यान बेडरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. साफसफाई करताना हा कॅमेरा तिच्या हाती लागला होता. यात घरातील सर्व दृश्ये चित्रीत झाली होती. त्यानंतर पीडितेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या दाम्पत्याला १२ वर्षांचा मुलगा आहे. विदेशातून परतल्यानंतर आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. काही दिवसांनी पती बंगळुरूमध्ये राहायला गेला. प्रत्येक शनिवारी - रविवारी मुलाला भेटण्यासाठी पुण्यात यायचा. पत्नीवर नजर ठेवण्यासाठी त्याने बेडरूममध्ये कॅमेरा बसवला. हा कॅमेरा एके दिवशी तिच्या हाती लागला. संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात तक्रार दिली.

Web Title: The 'eye' on the wife by putting a camera in the bedroom