शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी लाभार्थ्यांसाठी कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 19:50 IST

अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी व प्रत्येक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लाभार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देसदस्यांची मागणी मान्य : जिल्ह्यातून ३२५३ अर्ज दाखल ; ८६४ अर्ज ठरले अपात्रअपात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत मुदतयंदा शेवई मशीन, ब्युटी पार्लरचे साहित्य आणि शेळी पालनाचा लाभ देणार

पुणे : जिल्हा परिषदेच्या वैयक्तीच्या लाभाच्या योजने (डीबीटी) चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून ३ हजार २५३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ८६४ अर्ज अपात्र ठरले आहेत. या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी व प्रत्येक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लाभार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्याबाबत संबधित तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही काही सदस्यांनी लाभार्थ्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ द्यावी, उत्पन्नाचा दाखला मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा, कोणीही लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाने जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार ही मुदतवाढ कागदपत्रे सादर करण्यासाठी असून, नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे दीपक चाटे यांनी सांगितले.जिल्ह्यातून तब्बल ३ हजार २५४ लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. त्यातील २ हजार ३९० अर्ज पात्र ठरले असून, ८६४ अर्ज अपात्र ठरले आहेत. या अपात्र अर्जात कागदपत्रांच्या त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. यंदा शेवई मशीन, ब्युटी पार्लरचे साहित्य आणि शेळी पालनाचा लाभ देणार आहे.

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषद