शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना जातपडताळणीसाठी दीड महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 13:53 IST

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्याक्रमांच्या कोर्सेससाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे...

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे प्रवेशाच्या वेळीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्तीराज्य सीईटी सेलने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध

पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यामुळे हजारो विद्यार्थी अडचणीत आले होते. यापार्श्वभूमीवर जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासनाने दीड महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.  बीई व बीटेक, बीफार्मसी व डी. फार्मसी, आर्किटेक्चर पदवी, पदवीस्तरावरील हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए व एमएमएस आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० आॅगस्ट पर्यंत, एमसीए १९ आॅगस्ट, एसएससी डिप्लोमा २५ आॅगस्ट, एचएचसी डिप्लोमा २६ आॅगस्ट, थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा २३ आॅगस्ट पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे प्रवेशाच्यावेळीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांचे शिक्षण अडचणीत सापडले आहे. यापार्श्वभूमीवर नॅशनल स्टूडुन्ट युनियन आॅफ इंडियासह अनेक संघटनांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याच धर्तीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुदतवाढ देण्याचे आदेश काढले आहेत. राज्य सीईटी सेलने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असेही सेलने तंत्रशिक्षण संचालनालयास कळविले आहे. त्यानुसार कार्यवाही करावी असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी स्पष्ट केले आहे..  

टॅग्स :PuneपुणेCaste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकारStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक