शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:59 IST

प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले

पिंपरी : स्वस्त धान्य दुकानात वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ डिसेंबर होती, परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत, तरीदेखील वितरणात २ ते ४ टक्क्यांची गळती असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. कार्डवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ ऑक्टोबर होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी व्यवस्था कोलमडली होती.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी करता आले नव्हते. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सर्व्हर डाउन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यास अडचणी येत होत्या. अनेक शिधापत्रिकाधारकांचे अजूनही ऑनलाइन केवायसी झालेले नाही. त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे. - प्रशांत खताळ, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी 

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रfoodअन्न