शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एक्स्प्रेस-वेवरील टोल १८ टक्के वाढला; १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 06:37 IST

सव्वातीन वर्षांत टोलवसुलीत ७०% वाढ

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहनांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. गेल्या सव्वातीन वर्षांत टोलवसुलीत ७० टक्के वाढ झाली. असे असतानाही आता त्यात १ एप्रिलपासून टोलमध्ये १८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने खासगी बस असोसिएशनने बसभाड्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्याच वेळी हा टोल रद्द करावा, यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. त्यामुळे एका बाजूला वाहतूक कोंडीत वाहनांचा वेळ जात असतानाच आता त्यात टोलधाडीचा मारा पडणार आहे. एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्यानंतर त्यावरून वाहने न जाता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जातात. त्यामुळे दोन्ही महामार्गांचे काम २००४ मध्ये ‘आयआरबी’कडे १५ वर्षांच्या कराराने देण्यात आले होते. त्यानुसार ही मुदत संपण्यापूर्वीच २०१६ पर्यंत खर्च झालेली सुमारे २ हजार ७०० कोटी रुपये वसूल झाली होती. असे असतानाही हा टोल सुरू ठेवण्यात आला. त्यात खंडाळा-खोपोली लिंक रोडच्या कामाचा समावेश करून आता पुन्हा या टोलधाडीचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. या करारातील अनेक बाबींचे कंत्राटदार कंपनीकडून उल्लंघन वेळोवेळी झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. मात्र, या करारातील एका मुद्द्याचा आधार घेऊन दर ३ वर्षांनी टोलच्या रकमेत वाढ केली जाते.

एक्स्प्रेस-वेवर सप्टेंबर २०१९मध्ये दरमहा ६० कोटी रुपये टोल वसूल केला जात होता. तो जानेवारी २०२३मध्ये दरमहा १०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०१९मध्ये या महामार्गावरून दरमहा १० लाख ७३ हजार कार धावत होत्या. आता जानेवारी २०२३मध्ये त्यांची संख्या १३ लाखांहून अधिक आहे. अन्य वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

टोल न भरणारी दीड लाख वाहनेटोल न भरता वाहनांना या महामार्गावरून जाणे अशक्य आहे. असे असताना दरमहा या महामार्गावरून दीड लाख वाहने टोल न भरता जातात, अशी कोणालाही न पटणारी आकडेवारी टोल कंपनीकडून वर्षानुवर्षे दाखविली जात आहे. त्यात अगदी मोठी थ्री एक्सएल वाहनांची संख्या १,८००हून अधिक दाखविली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या सव्वातीन वर्षांत मासिक टोलवसुलीमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. तरीही, १ एप्रिलपासून टोलदरात १८ टक्क्यांनी दरवाढ करण्यात येणार आहे. ही दरवाढ किती अनावश्यक आणि नागरिकांच्या खिशावर डल्ला मारणारी आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

वाहन     आताचे दर     १ एप्रिलपासून चारचाकी     २७०     ३२० टेम्पो     ४२०     ४९५ ट्रक     ५८०     ६५८ बस     ७९७     ९४० थ्री एक्सएल     १,३८०     १,६३०एम एक्सएल     १,८३५     २,१६५

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणे