शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

लष्कर आणि रेल्वेतील बोगस भरती घोटाळ्याचा पर्दाफाश; लष्कर व गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:12 IST

लष्कर व गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, दोघे ताब्यात...

पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणाचा खोलवर जात तपास केल्यानंतर आता लष्कराच्या मदतीने गुन्हे शाखेने लष्कर आणि रेल्वेतील बोगस भरतीतील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भारत कृष्णा काटे (वय ४१, रा. मु़ पो़ राजुरे, ता. सांगोला, जि़ सोलापूर) राजेंद्र दिनकर संकपाक (रा. सातारा), दयानंद जाधव आणि बि. के. सिंग (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सलमान गौरुउद्दीने शेख (वय २१, रा. मु़ पो़ करडखेल, लव्हारा, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर गुन्ह्याच कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे तसेच आय टी अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील विविध ठिकाणी हा प्रकार ऑगस्ट २०२० मध्ये घडला आहे. 

आरोपींनी आपआपसात संगनमत करुन सलमान, शिवाजी जाधव आणि नवनाथ जाध यांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यांची खरोखरच भरती केली जात असल्याचे भासविण्यासाठी त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांशी, रांची, लखनौ, जबलपूर येथे बोलावून घेतले. तसेच पुण्यातील घोरपडी येथील आर्मी कार्यालयासमोरही आरोपींनी त्यांची भेट घेतली. त्यांनी हेडकॉर्टरल आर्मी या नावाने बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे  चौघांकडून १३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली. 

याबाबतची लष्कराच्या इंटेलिजन्सला इनपुट मिळाले होते. त्यानुसार पुणेपोलिसांनी लष्कराच्या मदतीने सोलापूर येथून दोघांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लष्कर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष झिरो टॉलरन्स असावी, यासाठी आर्मीचा कटाक्ष आहे. त्यातून अशा गुन्ह्यांमध्ये लष्कराकडून पोलिसांना माहितीची देवाण घेवाण करण्याबरोबर तपासात संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे सर्दन कमांडच्या वतीने सांगण्यात आले....पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्कर भरतीतील पेपरफुटी प्रकरणात लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक करुन मोठे रॅकेट उद्धवस्त केले होते. त्यासाठी लष्कराच्या मदतीने देशातील विविध भागातून लष्करी अधिकार्‍यांना अटक केली आहे. लष्कर व रेल्वे भरती प्रकरणात मोठे असण्याची शक्यता असून त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानrailway recruitmentरेल्वेभरतीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक