पुण्यात भंगाराच्या दुकानात स्फोट, १ ठार
By Admin | Updated: September 1, 2015 12:56 IST2015-09-01T12:56:00+5:302015-09-01T12:56:00+5:30
पुण्यातील कोंडावा येथे एका भंगाराच्या दुकानात स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

पुण्यात भंगाराच्या दुकानात स्फोट, १ ठार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - पुण्यातील कोंडावा येथे एका भंगाराच्या दुकानात स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. तर नारायणगाव पोलिस ठाण्याजवळही स्फोट झाला असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मंगळवारी सकाळी पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाले. यातील पहिला स्फोट नारायणगाव पोलिस ठाण्याजवळ झाला. एका बाईकवर स्फोटक पदार्थ ठेवण्यात आली होती. बाईक सुरु करताच स्फोट झाला व यात एक तरुण गंभीर जखमी झाला. वैयक्तिक वादातून हा स्फोट घडवला गेला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलीआहे. या स्फोटानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जिलेटिन व डिटोनेटर्सही आढळल्याचे समजते.
दुसरी घटना कोंडवा येथील भंगाराच्या दुकानात घडली. या दुकानात झालेल्या स्फोटात एक ठार तर तिघे जण जखमी झाल्याचे समजते. या स्फोटांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.