शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

बहि:स्थचे शुल्क कमी होऊनही प्रवेश होईनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 02:21 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात घट करण्यात आली. मात्र, प्रवेश शुल्क कमी करूनही विद्यार्थीसंख्येत वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात घट करण्यात आली. मात्र, प्रवेश शुल्क कमी करूनही विद्यार्थीसंख्येत वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये केवळ १५ हजार ८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजारांपेक्षा कमी आहे.नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणाºयांना तरूण-तरूणी, गृहिणींना तसेच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे महाविद्यालयात नियमित प्रवेश न घेऊ शकणाºया विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात बहि:स्थ अभ्यासक्रम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला होता. मात्र, सर्वच स्तरांतून त्यास विरोध झाल्याने विद्यापीठ प्रशासनाला माघार घ्यावी लागली. परंतु, विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या शुल्कात अवास्तव वाढ केली. परिणामी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, विद्यापीठ अधिसभेतील सदस्यांकडून बहि:स्थ अभ्यासक्रमाचे शुल्क कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने दोन वेळा बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या शुल्कात घट केली. त्यामुळे विद्यार्थीसंख्येत वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. बहि:स्थ अभ्यासक्रमाचे शुल्क सुमारे सहा ते सात हजार रुपये होते. परंतु, विद्यापीठाने २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांपर्यंत शुल्क कमी करूनही यंदा बहि:स्थ अभ्यास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या केवळ १५ हजार विद्यार्थ्यांनीच बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रथम वर्षास नव्याने प्रवेश घेतला आहे.नोकरी करून शिक्षण घेणाºया तरुण-तरुणींना तसेच गृहिणींना नियमितपणे महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. परिणामी हजारो विद्यार्थी बहि:स्थ पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन कला व वाणिज्य शाखेची पदवी व पदव्युत्तर पदवी घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. तर काहींना सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळते. विद्यापीठांकडून बहि:स्थ अभ्यासक्रम बंद केला जाणार होता; त्या वेळी सर्वच स्तरांतून विरोध झाला. परंतु, विद्यार्थ्यांनीच या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना कमी खर्चात पदवी व पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.- शिवाजी आहिरे, उपकुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठ