आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचा गौरव
By Admin | Updated: March 19, 2015 00:28 IST2015-03-19T00:28:59+5:302015-03-19T00:28:59+5:30
एएसएम गु्रप आॅफ इन्स्टिट्यूट्सतर्फे पुरस्कारांचे वितरण संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे उपस्थित होत्या.

आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचा गौरव
पिंपरी : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कॅपजेमिनी फायनान्स सर्व्हिसेस ग्लोबल बिझनेस युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर विखे, पॅको इंडियाचे संचालक विनायक पंडित आणि सीड इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र बऱ्हाटे यांना एएसएम एक्सलन्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील एएसएम गु्रप आॅफ इन्स्टिट्यूट्सतर्फे पुरस्कारांचे वितरण संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे उपस्थित होत्या.
शिकारपूर म्हणाले, ‘‘आयटी क्षेत्रात भारत देश अग्रेसर आहे. त्यामुळे सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने ‘सर्व्हिस हब’ म्हणून देश जगात प्रसिद्ध आहे. सर्व्हिस क्षेत्रात उत्पादनक्षमतावाढीसाठी नवनिर्मिती गरजेची आहे. यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जावीत.’’
पुरस्काराविषयी विखे म्हणाले, ‘‘क्लाउंड कॉम्प्युटिंग या संगणक क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी आहेत. या संधीचा फायदा तरुणांनी घ्यावा. या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे.’’
बऱ्हाटे म्हणाले, ‘‘रोजगाराभिमुख शिक्षणपद्धती काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शिक्षणसंस्थांनी प्रशिक्षण पद्धती अवलंबून कौशल्यपूर्ण शिक्षण तरुणांना देण्याचे ध्येय बाळगावे.’’ संदीप पाचपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रभा शंकर यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. प्रा. रिंपल आहुजा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आशिष दीक्षित यांनी आभार मानले.