आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अनुभवा भक्तीसंगीताचा रंग
By Admin | Updated: July 3, 2017 08:41 IST2017-07-03T08:41:29+5:302017-07-03T08:41:29+5:30
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अभंगरंग हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अनुभवा भक्तीसंगीताचा रंग
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - लोकमत सखीमंच व यु एस के फाउंडेशन प्रस्तुत व कोहिनूर ग्रुप यांच्या सहयोगाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अभंगरंग हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य असून, रसिकांना पंडित शौनक अभिषेकी, राहूल देशपांडे व जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुमधूर गीतांचा व भजनांचा आस्वाद घेता येईल. सोमवार 3 जुलै रोजी पंडित फार्मस, न्यू डी पी रोड, कोथरूड येथे संध्याकाळी 5:30 वाजता कार्यक्रम सुरु होईल.