शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 18:48 IST

मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते.

ठळक मुद्दे अनेकजण याविषयी पाकिस्तानशी चर्चा करू असे म्हणतात. परंतु, चर्चेची वेळ निघून गेली आता

पुणे : मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते. मागील दहा दिवसांपासून जो प्रकार देशात घडत आहेत. याबाबत अनेकजण याविषयी चर्चा करू असे म्हणतात. परंतु चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. आम्ही हे केले नाही असे पाकिस्तान बोलत आहे. त्यांना खोट बोलण्याची सवयच आहे. आपला देश अनेक बाबतीत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतु आपल्या आपापसातच दुफळी निर्माण व्हावी असा इतरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण एकत्र राहून काम केले तर सैनिकांना देखील बळ मिळेल,असे प्रतिपादन मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी केले. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशदवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशिधरन नायर शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवार,चंद्रप्रकाश फाऊंडेशन व इतर संस्थांच्यावतीने ह्यजरा याद करो कुबार्नीह्ण या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमांतर्गत शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या कुटुंबियांना एक लाख बावन्न हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी  एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, वीरमाता लता नायर, वीरपत्नी तृप्ती नायर, नवचैतन्य हास्ययोग परिवारचे विठ्ठल काटे, सुमन काटे, पोपटलाल शिंगवी, प्रकाश धोका, मकरंद टिल्लू उपस्थित होते. भूषण गोखले म्हणाले, आपला देश हुशार असून खूप पुढे जाऊ शकतो. परंतु आपणच आपापसात भांडून एकमेकांचे शत्रू बनत चाललो आहे. आपल्यात कशी फूट पडेल यासाठी काही देश टपून बसलेच आहेत. त्यामुळे आपल्या देशात सगळ्यांनी एकी करणे महत्त्वाचे आहे,तृप्ती नायर यांच्या आई शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या सासूबाई निलेखा पेंटा यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, आमच्या अशा कठीण प्रसंगात संपूर्ण देश आमच्या पाठिशी असल्याने आम्ही धीराने या सगळ्याला तोंड देत आहोत. तुमचे असेच सहकार्य, आधार आणि प्रेम आमच्याबरोबर कायम असू द्या. विठ्ठल काटे म्हणाले, आपल्यासाठी आपले सैनिक जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करीत असतात. त्यामुळे सैनिकांना आपण आज हे सांगणे गरजेचे आहे की तुम्ही एकटे नाही सर्व देश तुमच्या पाठिशी आहे.--------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला